औरंगाबाद- शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख
अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज ( गुरुवार दि १० ) भारतीय स्टेट बँकेच्या
विभागीय प्रबंधकास ( मॅनेजर )
शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या संदर्भात घेराव घातला होता. यावेळी अंबादास
दानवे यांनी कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पासबुकसह कर्जमाफी न झाल्याचे
दाखले देत विभागीय प्रबंधक धनंजय अभ्यंकर यांना यासंबंधी जाब विचारला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांच्या बुधवारी बीड येथील सभेत बाळासाहेब हरिभाऊ सोळंके या शेतकऱ्याने उद्धव
ठाकरे यांना आपली कर्जमाफी झाली नसून फसवणूक या सरकारकडून झाली असल्याचे सांगितले
होते. स्वतः उद्धव ठाकरेंच्या तोंडून जेव्हा त्या शेतकऱ्याची झालेली फसवणूक उघड
झाली तेव्हा बँक यवस्थापनाने काही तासानंतर त्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली
असल्याचे सांगितले होते. त्यावर बोलताना अंबादास दानवे यांनी त्या शेतकऱ्याचे
पासबुक विभागीय प्रबंधक धनंजय अभ्यंकर यांना दाखवून त्यासंबंधी जाब विचारला. दानवे
पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या सभे नंतर सहकार
मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले की सदर शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम
नोव्हेम्बर २०१८ मधेच जमा झाली आहे मात्र १ जानेवारी २०१९ पर्यंत त्याच्या
खात्यावर कुठलीही रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट असून सुभाष देसाई खोटं बोलतायत
का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हे ही प्रश्न केलेत दानवे यांनी
उपस्थित.
१ ) जर मंत्री नोव्हेंबर २०१८ च्या
आधीच खात्यात पैसे जमा केले म्हणत असतील तर बँकेने शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम
वर्ग का केली नाही ?
२ ) आशा हजारो शेतकऱ्यांच्या रक्कम
बँकेत येऊन पडल्या असताना,
शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज चालू आहे, बँक ती रक्कम कोणाच्या हितासाठी वापरत
आहे ?
३ ) यामध्ये सरकार खरे की खोटे बोलते
बँकेची भूमिका शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याची की. कर्जमाफी हीच फसवी आहे याचा
खुलासा शेतकऱ्यांना व्हावा.
४ ) आपल्या बँकेमार्फत मराठवाडा
विभागासाठी किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले, किती मंजूर झाले, त्याची एकूण रक्कम , सरकारने दिलेली रक्कम, ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग
केली की नाही ? याचा देखील खुलासा व्हावा
५ ) एन पी ए खाते दैनंदिन व्यवहारात
नसल्याने अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित असून अशा प्रकारची किती खाती प्रकरणे
आहेत ज्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला की नाही याविषयी सुद्धा खुलासा व्हावा.
आपल्या प्रश्नाचे समाधान न झाल्यास आपण
तीव्र आंदोलन करणार असल्याचे देखील अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले आहे.